रत्नागिरी, (आरकेजी) : सध्या वाहत असलेले वेगवान वारे आणि धुक्यामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नौका किनाऱ्यावरच आहेत.
ओखी वादळ जरी शमल असलं, तरी त्याचे परिणाण अद्यापही दिसून येत आहेत. या वादळाचा सर्वाधिक फटका मच्छिमारांना बसला आहे. रत्नागिरीत कोट्यावधीची उलाढाल ही मासळी व्यावसायातून होत असते.कोकणचं अर्थकारण हे मासळी व्यावसायवर अवलंबून आहे, मात्र या व्यवसायावर ओखी वादळाचा परिणाम दिसून येत आहे. वादळ शमल्यावर गेल्या आठवड्यात मच्छिमारांनी समुद्रात जाण्यास सुरुवात केली, मात्र त्यांना मासे मिळत नाहीयेत. वेगवान वारे आणि सकाळचं धुक यामुळे मासळी मिळेनाशी झाली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे मासळी खोल समुद्रात गेल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. मासळी मिळत नसल्यानं नौका बंदरात उभ्या आहेत. या बिघडलेल्या वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांचे करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे.