रत्नागिरी (आरकेजी): गणेशोत्सवाची रंगत वाढविणाऱ्या साहित्यांना यंदा जीएसटीचा फटका बसला आहे. साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने त्या खरेदी करण्यास ग्राहकांनीही हात आखडता घेतला आहे. कारागिरांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
कोकणातला गणेशोत्सव हा नेहमीच वैशिष्ठपुर्ण म्हणुन ओळखला जातो. गणेशोत्सव म्हटल्यावर त्याच्यासोबत आली विविध वाद्य. गणेशोत्सवातील आरती, भजन, जाखडी यांची रंगत वाढवतात ती ही वाद्ये. पण सध्या या वाद्यांचे नाद महागलेत. जीएसटीमुळे या वाद्यांच्या कच्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या मृदुंग, नाल आणि ढोलकी अशा साऱख्या वाद्यांच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी ३५०० हजार रुपयाला मिळणारा तबला आता ४ हजारहून अधिक रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर मृदुंगाची किंमत यापूर्वी ३५०० होती, आता तीच ४ ते ४५०० हजाराच्या घरात गेली आहे. ठोका पडताच ताल धरायला लावणारी ढोलकी अडीच ते तीन हजार रुपये झाली आहे. त्यामुळे ही वाद्य बनविणारे कारागीर हवालदिल झालेत. किंमती वाढल्यामुळे हि वाद्य बनवणारे कारागिर हवालदिल झाले आहेत. दिवसाला दहा नाल विकल्या जायच्या, त्याठिकाणी आज पाच विकताना तारेवरची करसत करावी लागतेय, अशी माहिती ढोलकी व्यावसायिक विवेक भोसले यांनी सांगितले. कोकणात दिवाळीपेक्षा ही गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. त्यामुळे या काळात वाद्य साहित्यांना जीएसटीतून वगळण्यात यावे, अशी मागणी कोकणातील वाद्य साहित्य विक्रेते करत आहे.