
,मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत ना. शेख यांच्या दालनात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी मान्यवर उपस्थित होते.
एैतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलाॅकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली.
अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली.