
रत्नागिरी : नुकतंच लग्न झालेल्या तरूणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल नजिकच्या अर्जुना धरण परिसरात ही सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. शशिकांत लक्ष्मण खेडेकर (२६) असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. शशिकांतच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते.
शशिकांत सोमवारी संध्याकाळी आपल्या कुटुंब व मित्रांसोबत अर्जुना धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह त्याला आवरला नाही. या मोहानेच त्याचा घात केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो आत बुडू लागला.. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शशिकांतच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे..















