रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील स्वयंभू श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने विविध जातींच्या तब्बल 2200 रायवळ आंब्याची रोपे आज लावण्यात आली. धामणसे येथे पर्यटन क्षेत्र असल्याने स्वयंभू श्री रत्नेश्वर हे अनेकांचे कुलदैवत आहे. यामुळे यंदा प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात एक हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ट्रस्टने ठेवले होते. पण 2200 रायवळची रोपे लावण्यात आली. यासाठी गावातील ग्रामस्थ, तरुण, धाणमसे हायस्कूलचे विद्यार्थी असे 350 जण सहभागी झाले. स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. नव्या मंदिराचे संकल्प चित्र प्रसिद्ध केले आहे. या चित्रामध्ये मंदिराची पूर्वेकडील बाजूस हिरगावार डोंगर आहे. परंतु विविध ऋतूमध्ये निसर्ग आपले रंग बदलत असतो. म्हणजे पावसाळा सोडला तर नवीन मंदिरामागचा भाग हिरवागार दिसण्यासाठी वर्षभर हिरवेगार असणार्या रायवळ आंब्याची रोपे लावण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला. आज हा उपक्रम पार पडला.
कुलस्वामी श्री रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम काळ्या दगडापासून होत असून हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, असे रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शेखर देसाई यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देणयाचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.