मुंबई : प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय विमानतळाच्या आवारात साकारलेले मार्जरीनचे ‘त्रिमूर्ती’ शिल्प सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पहिल्या दिवसापासूनच ते पाहण्यासाठी देश-विदेशातील नागरिकांची गर्दी होत आहे. हे शिल्प ८ बाय ६.५ फुट उंचीचे बनवण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरले गेले आहे. २४ फेब्रुवारीला महाशिवरात्रीपासून ते पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. अवघ्या १० दिवसात शिल्पूप साकारण्यात आले. शिल्प पूर्ण करण्यासाठी देवव्रत यांनी कठोर मेहनत घेतली. दिवसातील १४ तास त्यांनी शिल्प बनवण्यासाठी व्यस्त होते. अखेर हे शिल्प साकारण्यात आले.
‘भारतीय संस्कृतीत ‘त्रिमूर्ती’ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहे; जे निर्मिती, संगोपन आणि विनाश ह्या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात. ज्या कधीच बदलत नाही. केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील ह्या पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागते, असे देवव्रत म्हणाले. भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून त्याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय काआर्व्हिंगची कला मला अंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील जोपासायची आहे. इतर कोणत्या शिल्पापेक्षा ‘त्रिमूर्ती’ रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले, असेही त्यांनी सांगितले.