रत्नागिरी (आरकेजी): देवरूख नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. देवरूख नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या स्मिता लाड आणि शिवसेनेच्या धनश्री बोरूकर यांचा त्यांनी पराभव केला. तर नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे.
१७ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप मनसे युतीने आठ जागांवर विजय मिळवला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बोरुकर यांचा ११९ मतांनी पराभव करुन मृणाल शेटे यांचा विजय झाला. त्यांना २ हजार ४३५ मते मिळाली. शिवसेनेच्या बोरुकर यांना २ हजार ३१६ तर राष्ट्रवादीच्या स्मिता लाड यांना १ हजार ९८१ मते मिळाली. भाजपचे सात नगससेवक निवडून आले. त्याखालोखाल सेनेचे चार राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. काॅग्रेस आणि मनसेचा एक उमेदवार निवडून आला. देवरूख नगरपंचायतीमध्ये पंचरंगी लढत होती. इथे भाजप आणि मनसे एकत्र येत निवडणुक लढली होते. तर शिवसेना आणि स्वाभिमान पक्ष स्वतंत्र निवडणुक रिंगणात होते. तर काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि जनता दलाची इथे आघाडी होती. देवरूख नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार सदानंद चव्हाण, माजी राज्यमंत्री रविंद्र माने आणि माजी आमदार सुभाष बने यांची प्रतिष्ठापणाला होती. मात्र देवरूख नगरपंचायतीवर अखेर कमळ उगवला आहे. यापुर्वी देवरूख नगरपंचायतीमधून एक अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे या अपक्ष उमेदवाराला हाताशी धरून भाजप मनसे सत्तेचा सोपान पार करु शकते.
विजयी उमेदवार
भाजप : वैभव कदम, धनश्री आंबेकर, आश्विनी पाताडे, ऱेश्मा किर्वे, संतोष केदारी, सुशांत मुळ्ये, राजेंद्र गवंडी
शिवसेना : प्रकाश मोरे, वैभव पवार, निदा कापडी, अनुष्का टिळेकर
राष्ट्रवादी : उल्हास नलावडे, प्रफुल्ल भुवड, प्रेरणा पुसाळकर
काँगेस : प्रतिक्षा वणकुद्रे
मनसे : सान्वी संसारे
अपक्ष : वैभवी पर्शराम (बिनविरोध)