
मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आयोजित माघी गणेशोत्सव २०२६ निमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भक्तिरसाने ओथंबलेला संगीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्तुती शशिकला संगीत प्रतिष्ठान व सुयोग संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता मंदिर परिसरात हा भक्तिमय संगीत कार्यक्रम होणार असून, गणरायाच्या चरणी स्वरांजली अर्पण केली जाणार आहे.
या कार्यक्रमात सौ. सुयोग मराठे, सौ. ममता मेस्त्री, श्री. मिहीर टेमकर व कु. दुर्वा मराठे हे गायक भक्तिगीते सादर करणार आहेत. त्यांना कीबोर्डवर ओंकार गोखले, तबल्यावर देवांग मराठे आणि साईड रिदमवर कृष्णा कावले साथ देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन श्री. मिलिंद बने करणार आहेत.
सर्व गणेशभक्त व संगीतप्रेमींनी या भक्तिरसपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.















