रत्नागिरी : राज्यस्तरीय स्वच्छता मेळावा ३० मे रोजी मुंबईत झाला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हे परिषदेतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रा. पं. देवघर, ता.खेड ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, बबनराव लोणीकर यांनी सत्कार केला. या मेळाव्यामध्ये राज्यातील ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. त्या जिल्हा परिषदांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हयाचा सत्कार जिल्हा परिषद. अध्यक्षा, , स्नेहा सावंत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पा. व. स्व,. नूतन सावंत यांनी स्विकारला ,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यामध्ये केंद्र शासनाची मोहीम दरवाजा बंद याचे ही मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या माहीमेच्या जाहिरातीमध्ये स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बॅसिटर. अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका केली आहे या राज्यस्तरीय मेळाव्यास जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी चे सर्व तज्ञ व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पा. व स्व जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांगितले.