डेरवण : सज्जन लोक शक्तीशाली झाले पाहीजेत तर शक्तीशाली लोक सज्जन झाले पाहीजेत तरच खऱ्या अथार्न देशात एकता नांदेल असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सहकायर्वाहक भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट च्या माध्यमातून भक्तश्रेष्ठ क.ल.वालावलकर रुग्णालयाच्या परिसरात नुकत्याच उभारण्यात आलेल्या भित्तीशिल्प उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत डेरवण ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त अशोक (काका) जोशी, कायर्कारी विश्वस्त विकास वालावलकर, वैद्यकीय विभागाच्या प्रमुख सुवणा पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कलयुगात प्रत्येक शक्तीशाली माणूस हा आपल्या पेक्षा कमी क्षमतेच्या माणसावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु असे करण्यापेक्षा जर तो सज्जन झाला. आणि सज्जन जर शक्तीशाली झाला. तरच आपली आपल्या समाजाची उन्नत्ती होईल. सह्याद्री च्या कुशीत छत्रपतींचे अनेक किल्ले आहेत. त्या किल्ल्याची आज दुरवस्था झाली आहे. तर अनेक किल्ल्यावर पिकनीक काढल्या जातात. त्या किल्ल्याकडे पीकनिक स्पाट म्हणून न पाहता प्रेरणा देणारी केंद्रे असे पाहणे आवश्यक आहे. अनेक किल्ल्याचे बुरूंज तटबंदी ढासळली आहे. किल्ले असुरक्षित झाले आहेत. प्रत्येक तरुणाने आपली हीच खरी संपत्ती मानून किल्ले जतन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. भारत हा संताची परंपरा असलेला देश आहे. कोणताही देश उभा राहतो तो त्या देशाचा तरुण पिढी काय करते. या जगातील अनेक छोटे छोटे राष्ट्र बलशाली होण्यासाठी आपल्या देशातील तरुण पिढी घडविण्याकडे लागले आहेत. त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी देखील आपल्या देशासाठी काम केले जात आहे. त्यामुळे छोटी राष्ट्र देखील प्रगतीचा उंबरठा चढण्यासाठी पात्र ठरत आहे. त्यामुळे युवा पिढीने सक्षम होणे आवश्यक आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. हेच काम डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट च्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी भक्ती, शक्ती, ज्ञानाबरोबच सेवे ला देखील महत्व देण्यात येत आहे. ट्रस्ट च्या या चांगल्या कायार्ला मी शुभेच्छा देतो असे जोशी यांनी यावेळी सांगितले. तर संस्कृती जतन करण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जात आहे. या ठिकाणी विवीध अभ्यासक्रमांबरोबरच विदेशातील विवीध वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक या ठिकाणी गेली पंधरा वषेर् या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या माफर्त या ठिकाणी रुग्णावर उपचार करण्यात येतात. तर महिला बचत गट तसेच महिला मंडळांना सक्षम करण्याचे काम देखील संस्थेने हाती घेतले असुन, या कामाला पंचक्रोशीतील अनेक महिलांनी पाठींबा दिला आहे. अशी माहिती संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी सुवणा पाटील यांनी दिली.