मुंबई : बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरानां विविध आजारांनी डोके वर काढले आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, ताप, कॉलरा, कावीळ या आजारांनी मुंबईकर त्रस्त असून सष्टेंबर महिन्यात लेप्टोने एकाचा बळी घेतला तर डेंग्यूमुळे ५ जण दगावले.
मुंबईत सध्या मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हेपटीटीस, कॉलरा या आजारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. सष्टेंबर महिन्यात मलेिरयाचे ६२५, लेप्टोचे २७, डेंग्यूचे ३९८, गॅस्ट्रोचे ४४५, हेपटीटीसचे १११ रुग्ण आढळून आले. यािशवाय ४३६५ संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूमुळे ९ तर लेप्टोमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. मलेरीया, डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.