मुंबई : डेल्टा एअर लाईन्सने मुंबई ते न्यूयॉर्क-जेएफके दरम्यान सुरु केलेल्या विमानसेवेचे पहिले विमान आकाशात झेपावायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. जगातील या दोन अतिशय महत्त्वाच्या शहरांदरम्यान एकमेव नॉनस्टॉप विमानसेवेतील पहिले विमान मंगळवार २४ डिसेंबर २०१९ रोजी टेक-ऑफ करणार आहे. या विमानसेवेमुळे युनायटेड स्टेट्समधील इतर अनेक शहरांसाठी जोड विमानसेवांची विशाल श्रेणीदेखील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
या नवीन विमानसेवेमुळे डेल्टाच्या नेटवर्कमधील भारत व युनायटेड स्टेट्स दरम्यानच्या सेवेची आजवरची कमतरता भरून निघणार आहे. मुंबई ते न्यूयॉर्क-जेएफके मार्गासाठी कंपनीने आपले नवीन आधुनिकीकरण करण्यात आलेले बोईंग ७७७-२००एलआर एअरक्राफ्ट सज्ज केले आहे. डेल्टाची सर्वात आधुनिक अंतर्गत व्यवस्था डेल्टा वन सूट ही ऑल-सूट बिझनेस क्लास केबिन तसेच डेल्टा प्रीमियम सिलेक्ट सेवा देणारी प्रीमियम इकॉनॉमी, डेल्टा कम्फर्ट+ आणि मुख्य केबिन ही सर्व वैशिष्ट्ये या नवीन विमानामध्ये आहेत. ७७७ विमानामध्ये प्रत्येक केबिनमध्ये अशाप्रकारच्या इतर विमानाच्या तुलनेत सर्वात रुंद आसने असून त्यामुळे विमानातील प्रत्येक प्रवाशाला अत्याधिक आरामदायी प्रवासाचा पुरेपूर अनुभव घेता येतो. त्याचबरोबरीने डेल्टा प्रीमियम सिलेक्ट व कम्फर्ट+ मधील प्रवाशांना अधिक जास्त मोकळी जागा आणि लेगरूम यांचे फायदे मिळतात.
मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात डेल्टाचे आफ्रिका, मध्य पूर्व आणि भारत या भागांचे डायरेक्टर सेल्स जिमी इशेलग्र्युइन यांनी सांगितले, “डेल्टाने आपल्या विमानसेवा भारतात पुन्हा सुरु केल्यामुळे आता मुंबई आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान अधिक चांगली कनेक्टिव्हिटी सुरु झाली आहे. आमच्या प्रवाशांना नवनवीन तंत्रज्ञान, नवीन सेवासुविधा, सर्वात नवीन ऑन-बोर्ड केबिन्स आणि सेवांमधील सुधारणांचा लाभ घेता येईल. मुंबई आणि न्यूयॉर्क दरम्यान प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. उत्तर अमेरिकेमध्ये सर्वाधिक भारतीय अमेरिकन लोकसंख्या न्यूयॉर्कमध्ये आहे. काम, पर्यटन किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी मुंबई व न्यूयॉर्क दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. या सर्व प्रवाशांना डेल्टाच्या विमानसेवांमुळे अधिक आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.”
- आरामदायी आसनांबरोबरीनेच डेल्टा विमानातील प्रवाशांना इतरही अनेक आधुनिक सुविधां अनुभवण्याचे सुख मिळते
- जेवणाच्या विविध पर्यायातून आपल्या आवडीचा पर्याय निवडणे, यामध्ये पूर्व व पश्चिमेकडील स्थानिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा समावेश, त्यासोबत मुखवास व मसाला चहा
- कॉम्प्लिमेंटरी सीटबॅक एंटरटेनमेंट सिस्टिमवर १५ पेक्षा जास्त बॉलिवूड फिल्म्स मागणी केल्यास उपलब्ध करवून दिल्या जातात. त्याचबरोबरीने अनेक हॉलिवूड सिनेमे, लोकप्रिय टीव्ही मालिका, गाणी, गेम्स यांचाही आनंद घेता येतो.
- सर्व प्रवाशांना अमेनिटी किट्स दिली जातात, यामध्ये आयशेड्स व ब्लँकेट्स असतात, ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक आरामदायी व सुखकर होतो.
- जमिनीपासून ३०,००० फुटांवर असताना देखील तुम्ही आपल्या प्रियजनांसोबत संपर्क ठेऊ शकता कारण डेल्टा विमानामध्ये प्रवाशांना आयमेसेज, व्हाट्सअप आणि फेसबुक मेसेंजर या सुविधा मोफत मोबाईल मेसेजिंगमार्फत उपलब्ध करवून दिल्या जातात. याशिवाय जलद गतीने चालणाऱ्या वाय-फायचा ऑप्शनल पेड-फॉर ऍक्सेस देखील मिळू शकतो. त्यामुळे विमानात बसून तातडीचे ईमेल्स पाठविण्याचे काम देखील करू शकता.
- डेल्टा वन केबिनला स्लायडिंग दरवाजा, पर्सनल स्टोवेज एरिया आणि संपूर्णपणे आडवा होऊ शकेल असा बिछाना असल्यामुळे प्रवाशांना खाजगी जागेचा अनुभव मिळतो. हे प्रवासी फ्लाईटच्या आधी आपले जेवण ऑर्डर करून ठेऊ शकतात आणि विमानामध्ये ताज्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात.