मुंबई : रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली देहराडून एक्सप्रेस (19019 / 19020) रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार आज वांद्रे टर्मिनसहून ही ट्रेन सुरु होणार आहे. तसेच उद्या म्हणजेच 7 जुलैपासून देहराडून इथून परतीची ट्रेन सुटेल. मेरठ शहर आणि दौराला स्थानकांदरम्यान रेल्वे दुपदरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे ही सेवा खंडित करण्यात आली होती.