
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांचा आज वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतिनिमित्त वाशिष्ठी डेअरीच्या वतीने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन येथे आज कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राम कुलकर्णी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, ज्येष्ठ संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक साबळे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.















