New Delhi : भारतीय औषध महा नियंत्रक (DCGI) यांनी प्रौढ रूग्णांना मध्यम स्वरुपाच्या कोविड-19 च्या संसर्गात झायडस कॅडिला औषधी कंपनीच्या ‘विराफिन’ या उत्पादनाच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. विराफिन हे पेगिलेटेड इंटरफेराॅन अल्फा-2 बी यापासून मिळवले (डेरीव्हेटिव्ह) असून, संसर्ग झालेल्या रुग्णाला सुरवातीच्या कालावधीत, त्वचेच्या आंतर्भागांत हे औषध टोचल्यानंतर त्या रुग्णांना त्वरीत स्वास्थ्यलाभ झाला. विराफिन तयार करण्यासाठी झायडस कंपनीने जैवतंत्रज्ञान विभाग-जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परीषद यांच्या कोविड-19 संशोधन समूहातंर्गत एनबीएम द्वारे दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी अभ्यास आयोजित करायला दिलेल्या समर्थनासाठी त्यांची प्रशंसा केली आहे. या अभ्यासामुळे विराफिनची सुरक्षितता, सुसह्यता आणि प्रभावीपणा याला पुष्टी मिळाली. या अभ्यासादरम्यान असेही आढळून आले ,की विराफीनमुळे विषाणूंचा भार कमी होतो आणि पूरक प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने श्वसनावर येणारा ताण कमी करणे सहज शक्य होते आणि त्यामुळे रोगाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते. या बद्दल माहिती देताना बिराकच्या अध्यक्ष आणि डीबीटीच्या सचिव डॉ. रेणू स्वरुप म्हणाल्या,”विराफिनला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी देण्यात आलेली मंजूरी हा आणखी एक मैलाचा टप्पा असून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणाऱ्यांसाठी हे वरदान आहे.मी या सफल कार्यासाठी घेण्यात आलेल्या परीश्रमांची प्रशंसा करते.”
कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी यासंदर्भात आनंद व्यक्त करत सांगितले,” त्वरीत उपचार केल्यास विषाणूंचा भार अधिक प्रमाणात कमी करणे आणि रोगाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे,या उपचार पध्दतीमुळे शक्य झाल्याचे आमच्या लक्षात आले.”
विराफिन त्वचेच्या आंतर्भागात टोचल्यानंतर इतर विषाणू रोधक औषधांच्या तुलनेत रूग्णांना लवकर स्वास्थ्यलाभ झाला तसेच सातव्या दिवशी आरटी -पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची नोंद तिसऱ्या टप्प्यातील क्निनिकल चाचण्यांच्या अभ्यासाने केली.
जैवतंत्रज्ञान विभागाविषयी :
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारा जैवतंत्रज्ञान विभाग हा जैवतंत्रज्ञानाचा कृषी, आरोग्यसेवा, प्राणीशास्त्र,पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रातील वापर आणि उपयोजनाला प्रोत्साहन देतो. www.dbtindia.gov.in
जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परीषदेविषयी :
जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परीषद ही सेक्शन 8,शेड्युल B या अंतर्गत भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (इंटरफेस एजन्सी)असून जैवतंत्रज्ञानातील उपक्रमांचे सबलीकरण करुन ,जैवतंत्रज्ञान उपक्रमांद्वारे संशोधन रणनीती आणि नवनिर्मिती करत देशासाठी उपयुक्त अशा उत्पादनांचा विकास करण्यासाठी स्थापन झालेली परीषद आहे.. www.birac.nic.in
झायडस कॅडिला बद्दल:
कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड असेही नामाधिनान असलेली ही भारतातील आंतरराष्ट्रीय औषध उत्पादन कंपनी असून त्याचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. अधिक माहिती साठी या संकेतस्थळाला भेट द्या. http://www.zyduscadila.com/