रायगड जिल्हा, म्हसळे तालुक्यातील निसर्गरम्य वारळ गाव. डोंगरद-यात वसलेले, चोहोबाजूंनी निसर्गाचं वरदान लाभलेलं. डोंगरातून वाहणारी कडा नावाची नदी. असं हे सुंदर ठिकाण. येथील स्वयंभू दत्तमंदिर आणि येथे साजरी होणारी दत्तजयंती प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यामध्ये १०० फूट कोसळणारा झरा आणि आजूबाजूला असलेला हिरवागार प्रदेश. अतिशय निरव शांतता असलेला हा परिसर आजूबाजूच्या परिसरात खूप प्रसिद्ध झाला आहे.
१९७२ सालापासून स्वयंभू गुरुदत्त मंडळ नावाची सेवाभावी रजिस्टर संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत या ठिकाणी गेली ४९ वर्ष दरवर्षी दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .यावर्षी श्री दत्त जयंती महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे ५० वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.प्रति वर्षाप्रमाणे शैक्षणिक,क्रीडा तसेच प्रबोधनाचे कार्यक्रम नियोजित केले आहेत. येथील स्वयंभु स्थानाच्या जागेत मंदिर बांधण्याचा मानस गेली अनेक वर्ष मंडळाचे सभासद आणि भाविक भक्त गणांच्या मनात रुंजी घालत होता. श्री दत्त गुरुंच्या कृपेने आणि स्थानिक आमदार आणि खासदार सन्मा.सुनिल तटकरे साहेब, मा.आदितीताई तटकरे आणि मा.अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि माऊलींचे स्वयंभु स्थान विकसित होत आहे.
भगवंताचे हे कार्य करण्यासाठी यासाठी हजारो मदतीचे हात लागले आहेत. सर्वांचाच उल्लेख करणे शक्य नाही.परंतु या कार्यासाठी स्वयंभु गुरुदत्त मंडळ वारळ मुंबईचे सर्व सन्मा.सभासद,श्री काळभैरव मधली आळी मंडळ वारळ मुंबई, श्री आप्टेश्र्वर मंडळ, नवानगर वारळ मुंबई,श्री स्वयंभु गुरुदत्त मंदिर निर्माण समिती आणि अखिल आगरी समाज वारळ मुंबई या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शिवधनुष्य पेलणे सर्वथा अशक्यप्राय गोष्ट होती.
अशा या नयनरम्य निसर्गातील ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि स्वयंभू श्री दत्तगुरूंच्या मूर्तीचे दर्शन घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
__________________________________________
गाव- वारळ,पोस्ट- मेंदडी,ता.म्हसळा, जि. रायगड,मुंबईपासून २०० किमी.(गोवा हायवे,माणगाव वरुन उजवीकडे ५० किमी.तसेच दिवेआगर वरुन १२ किमी.)
रुपेश पाटील
अध्यक्ष: श्री स्वयंभु गुरुदत्त मंडळ मुंबई.