रत्नागिरी, (आरकेजी) : मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या मार्यांनी दापोली तालुक्यातील करजगाव तामसतिर्थ येथील जांभा चिऱ्याचा संरक्षण बंधारा वाहून गेला आहे. बंधारा तुटल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
भरतीच्या वेळेत समुद्राचे पाणी गावात घुसत आहे. त्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा बांधावा, या मागणीसाठी ग्रामस्थानी मागील वर्षी उपोषण केलं होतं. पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. समुद्राच्या उधाणामुळे नारळाची झाडेही उन्मळून पडली आहेत. सरकारने बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.