रत्नागिरी,(आरकेजी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि घरी बसावे, असा सल्लाच आज पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दानवेंना दिला. ते खेड इथे बोलत होते. दानवेंनी शेतकऱ्यांना संबोधून वापरलेल्या अपशब्दावरून ते कोंडीत सापडले आहेत. आता भाजपासोबत सत्ता उपभोगणार्या शिवसेनेनेही त्यांना घरचा आहेर दिला आहे. दानवे यांनी नुसती माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी राजीनामाच द्यावा, अशी मागणीच कदम यांनी लावून धरली आहे.