मुंबई, (निसार अली) : मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दामूनगर, इंद्रजित मार्केट येथील पादचारी पूल आज दुपारी 12.3O वाजताच्या दरम्यान कोसळला. हा पूल 15 वर्षे जुना होता. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूल कोसळला, अशी माहिती सचिन केळकर यांनी दिली. स्थानिकआमदार प्रकाश सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. लवकरच नवीन पूल लवकरच उभारण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले.