पहिल्या वर्षी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर दैनिक अग्रलेखचा दुसरा दिवाळी अंक( मुख्य संपादक -उमेश मारुती भेरे) यंदा बाजारात दाखल झाला आहे.अनेक दिग्गजांनी या दिवाळी अंकाचं स्वागत केलं आहे.ज्येष्ठ अभिनेते दिलीप तावडे यांनीही या अंकाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहे.अंकाचे मुखपृष्ठ विशेष संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन राजकीय सत्तासंघर्षत राज्यकर्त्याना फटकारे मारणारे आहे. या दिवाळी अंकात विविध विषयावर लेख, कथा, व्यक्ती वर्णन, इतिहासिक माहिती चा समावेश आहे.
अनेक विषयांना स्पर्श करणारा, विज्ञान विषयक विषयांबाबत कुतूहल यंदाच्या दिवाळी अंकातून निर्माण होते. याशिवाय नेहमीप्रमाणे मनाच्या सामर्थ्याच्या शोध घेणारा, सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर भाष्य करणारा, अनेकविध अनुभव अंकातून येतो.एक डाव पोलिसांचा -श्री. विजयकुमार बांदल, प्रेमचक्र -भिकू बारस्कर, पेरले ते उगवते -दिलीप प्रभाकर गडकरी, असा हा कर्मवीर, तुटलेले पंख -डॉ. अलका नाईक, कथा बळीराजाच्या अस्ताची -मैथिली उमेश भेरे, अण्णा -धनंजय खैरनार, पैसा झाला मोठा -डॉ. गंगाराम गणपत ढमके, पाऊस खुणा -अनिल भालेराव, अगणित चंद्रभागा -ऍड प्रीती बने, मला काय सांगायचंय -प्रा. मंगेश जवळेकर, डॉक्टर ऐका ना -संध्या मुळे देशपांडे, लोकप्रिय कवी /शाहीर उमेश पोटले -दीपक धोंडू कारकर, प्रेम /रंग महाल /कोशिंबीर -डॉ. दीपक खांडेकर, अहेव नवमी -गिरीश कंठे, गाठ -रामकृष्ण भेरे, माझ्या आठवणीतील दिवाळी आज हद्दपार होतेय -हरेश हरड, समाज प्रबोधन करणारे पंचरत्न मित्र मंडळ -शांताराम गुडेकर, अलक-विदुला खेडेकर, ती (लेखणी )सद्या काय करते -ऋचा सुनील पारेख, श्रवणलीला-लीना देगलूरकर, चित्रकार -ऍड -प्रीती बने, शिंधुनरेश आणि म्लेच्छ कन्या -संध्या मुळे देशपांडे, कथा पर्यावरणाची, व्यथा माथेरानची -एस. एम. देशमुख, उड जायेगा एक दिन….. आयु. सनी संगारे, आठवणीतले नाशिक -श्रीराम मु. शिंगणे, निष्काम सेवावृती-सुनील म्हसकर, काव्य फराळ – उमेश मारुती भेरे, संतोष विष्णु गावडे, मनस्वीनी सुप्रिया, डॉ. दीपक अरविंद, भास्कर आग्रे,प्रियंका बेलवले, माया दिलीपराव यावलकर, उर्वशी उमेश भेरे,यांसह अन्य लेखकांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.अंकाचे मुखपृष्ठ विशेष लक्ष वेधून घेते. साहित्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेला फराळ रुचकर झाला आहे.सृष्टिज्ञान आसपास असलेल्या अनेक गोष्टींची आपल्याला फारशी माहिती नसते. त्याबाबतचे महत्त्वही कधी लक्षात घेत नाही. सर्वसामान्यांना विज्ञान, प्राणी, पक्षी यांच्याबद्दल असलेली जिज्ञासा पूर्ण होऊन अचूक आणि वेधक माहिती यंदाच्या अंकातून दिली आहे. वैविध्यपूर्ण विषयांनी सजलेल्या या अंकातील काही लेख विज्ञानाविषयी कुतूहल वाढविणारे आहेत. लेखकांनी विविध विषयांवरील जिज्ञासा पूर्ण केली आहे.याशिवाय निसर्गाचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण यावर जागृती विविध लेखांतून जागृती केली आहे.मुख पृष्ठ-दिनेश रिकामे, अक्षर जुळणी /मांडणी -अविनाश दलाल, सजावट -भरत फर्डे यांचे असून विशेष सहाय्य – जेष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल,प्रकाश अंदाडे, शिवाजी भेरे, दीपक खांडेकर यांचे आहे.मुख्य संपादक श्री.उमेश मारुती भेरे, मूल्य – १५०/- रुपये,पृष्ठे-१०४-
शांताराम ल. गुडेकर
वृत्त पत्रलेखक /पत्रकार
मा.वि. का. अधिकारी महाराष्ट्र शासन
मोबाईल-९८२०७९३७५९