पालघर – डहाणू येथील समुद्रात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. बोटीत एकूण ४० विद्यार्थी होते. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले असून सात विद्यार्थी मृत झाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल आयोजिक करण्यात आली होती. ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सहलीत भाग घेतला होता. दरम्यान, महेश अंबिरे हा बोट मालक समुद्रात घेऊन गेला असता बोट उलटून दुर्घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनासह स्थानिकांचे शोधकार्य सुरू हाती घेतले. मच्छिमारांच्या बोटीदेखील बचावकार्यासाठी रवाना झाल्या. २ नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.