मुंबई: हिमालय पूल दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी पूलांच्या दुरुस्तीवर दिला आहे. पश्चिम रेल्वेनेही दादरचा पादचारी पुल दुरुस्तीसाठी बंद ठेवणार आहे.
दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेने २६५ पूलांच्या डागडूजीचा निर्णय घेतला. यानंतर पश्चिम रेल्वेनेही दादर फलाट क्रं. १, २ आणि ३ वरील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती सूचवली आहे. रविवारपासून १३ दिवस हा पूल बंद ठेवला जाईल. तसेच फटाक क्रमांक १ वरील घसरत्या जिन्याची दुरुस्ती १७ मार्चपासून १६ जून या कालावधीत करण्यात येणार असल्याने ९० दिवस जिना बंद असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी दक्षिणेकडील पादचारी पुलाचा पर्याय म्हणून वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी केले आहे.