मुंबई : जातीय उतरंडीची मटकी फोडून राजस्थानमधील घटनेचा आज दादरमध्ये निषेध करण्यात आला. यावेळी डाव्या-पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या.
राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना घडली आहे.इयत्ता तिसरीत शिकणारा ८ वर्षाच्या इंद्र मेघवालने पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या माठाला शिवल्याने मनुवादी शिक्षक छैल सिंह याने अमानुष मारहाण केली.या मारहाणीत इंद्रला गंभीर दुखापत झाली व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ जाती अंत संघर्ष समिती,मुंबईच्या वतीने पुरोगामी व समतावादी संघटना सोबत गुरूवार दि.१८ आॕगस्ट २०२२ रोजी,सायंकाळी ४:३० वा. दादर रेल्वे स्थानक पूर्व ,स्वामी नारायण मंदिरा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
या निदर्शनात सेंटर आॕफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) ,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) , भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) ,स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया ( SFI ), अखिल भारतीय जाती अंत समिती,दलित पँथर,रिपब्लिक सेना,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,AIYF, CPIM,CPI,जनता दल या कामगार,महिला,युवा व विद्यार्थी संघटना व पक्ष ,तसेच मुंबईतील इतर पुरोगामी ,समतावादी संघटनांनी देखील यात सहभागी झाल्या, अशी माहिती प्रविण भास्कर मांजलकर
निमंत्रक जाती अंत संघर्ष समिती यांनी दिली.