
मुंबई : शाळेला दांडी मारून दादर चौपाटीजवळील समुद्रात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. आज सकाळी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत तीनही मुलांचा मृत्यू झाला. अनुप यादव, भारत हनुमंत आणि रोहित यादव अशी त्यांची नावे आहेत. तिघेही १३ ते १६ या वयोगटातील होते. माहीम येथील उनल मील या शाळेत ते शिकत होते.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. तिघांचेही मृतदेह सापडले आहेत.