
रत्नागिरी, (आरकेजी) : सरकारी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतूनच दारुची चोरटी वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस-खेड या रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून ही वाहतूक होत होती. याप्र करणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तीन हजार २०० रुपयांचा मद्यसाठा, तसेच टाटा सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली.
दापोली शहराच्या एका दारूच्या दुकानासमोर शुक्रवारी ही रुग्णवाहिका थांबली होती. वाहनातील एका कर्मचार्याने दुकानातून दारूचा एक खोका आणला आणि रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस ठेवला. याचवेळी एका जागरूक नागरिकाने हा प्रकार पाहिला. त्याने याबाबत दापोलीतील पत्रकार मनोज पवार यांना सांगितले. पवार यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. मेहता रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका त्याने थांबिवली. तेव्हा मागच्या सिटखाली दारुच्या बाटल्यांनी भरलेला एक खोका होता. पवार यांनी लगचेच दापोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजय चिंचघरकर याला ताब्यात घेतले.