मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिमेला मालवणी भागातील एका चाळीत आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. मंजू कवर (वय 55) आणि शीतल(45) अशी मृत महिलांची नावे आहेत. जखमींवर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनीता ही महिला गंभीर जखमी आहे. तसेच जखमींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींमधील दोघांना उपचार करून सोडण्यात आले.
पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपास करत आहेत.
मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 8 एमएचबी कॉलनी भारत माता शाळेजवळील चाळ क्रमांक 91 मधील एका घरात सकाळी 8 वाजता ही घटना घडली. स्फोट इतका भयानक होता की भिंत कोसळली व छत तुटून पडले.