मुंबई, (निसार अली) : क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा संकुल समिती अंबरनाथ आयोजित मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य सायकलिंग स्पर्धा भरवण्यात आल्या. खुल्या वयोगटात 20 किलोमीटरची सायकलिंग शर्यत भरवण्यात आली. खुल्या गटात रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण 20 स्पर्धक खुल्या गटातून सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक रायगडचा सायकलपटू ओंकार जंगम, द्वितीय क्रमांक मुंबई- माटुंग्यातील अतिश जांबोटी, तृतीय क्रमांक रायगडचा शुभम कुसळकल यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.