मुंबई : कफ परेड येथील कोळीवाड्याचे सिमांकन लवकरच करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदंत दिली.
या बाबतची लक्षवेधी सूचना सदस्य राहूल नार्वेकर यांनी मांडली होती. त्यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या सर्वेक्षण व सिमांकनाच्या कार्यवाहीबाबत नेमलेल्या समितीने मुंबई शहर हद्दीतील 7 कोळीवाड्यांची बाहेरील हद्द मोजणीचे काम पुर्ण केले आहे. या मोजणीचे काम सुरु असताना कुलाबा येथील कफ परेड येथे मच्छिमारांची मोठी वसाहत असल्याने या कोळीवाड्याची खास बाब म्हणून कोळीवाडा घोषित करुन त्यांचे सिमांकन व मोजणी करण्यात येणार आहे. मत्स्य विभागील अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन उपलब्ध अभिलेखाची पडताळणी करुन याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच मच्छिमार नगर येथील कोळीवाड्यांच्या अन्य समस्यांबाबतही लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येईल.
या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, रमेश पाटील व अनिल परब यांनी सहभाग घेतला.