बकऱ्या चोरल्या
कल्याण : कल्याण पूर्व कचोरे येथील न्यू गोविंदवाडी येथे राहणारे यासीन शेख याच्या मालकीच्या दोन बकऱ्या होत्या. गेल्या बुधवारी १० तारखेला रियाज सय्यद, सलमान मजीत, आमन या तिघांनी त्यांच्या बकऱ्या रिक्षात कोंबून पळवून नेल्या. सदर बकऱ्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने यासीन यांनी या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी रियाज सय्यद, सलमान मजीत, आमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
पैसे न दिल्याने मारहाण
कल्याण : कल्याण पश्चिम राम बाग येथील जीवन संध्या अपार्टमेंट मध्ये राहणारे सुरज दुबे हे शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास सिंडीकेट चौक येथून पायी जात असतना आशुतोष सिंग नावाच्या तरुणाने त्यांना हटकले आणि पैशांची मागणी केली. दुबे याने पैसे देण्यास नकार दिल्यान संतापलेल्या आशुतोष ने हातातील चावीने दुबे यांच्या डोक्यावर, हातावर हल्ला केला. या हल्ल्यात दुबे याला दुखापत झाली असून या प्रकरणी त्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी आशुतोष सिंग विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु कला आहे.
मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला जाब विचारणाऱ्या दोन्ही भावावर चाकूने हल्ला
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले व चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून रात्री अपरात्री पादचाऱ्यांना लुबाडणारे गर्दुल्ले व चोरटे आता दिवसा ढवळ्या लुट करीत आहेत. स्टेशन परिसरात दोन भाऊ चालत जात असताना एका अज्ञात चोरट्याने एकाचा मोबाईल हिसकावला. यावेळी दुसऱ्या भावाने जाब विचारला असता या चोरट्याने त्याच्या पोटात चाकू खुपसला. यावेळी दुसरा भाऊ वाचवण्यास गेला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. या घटनेत दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात तुकाराम चौक परिसरात राहणारा शाम मंडल हा शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपला भाऊ राम व मित्रासोबत कल्याण रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना एका अज्ञात इसमाने शाम याचा मोबाईल हिसकावला. त्यामुळे राम याने या इसमाल जाब विचारला असता या चोरट्याने राम याच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे शाम हे त्याच्या मदतीला धावले. त्यामुळे संतापलेल्या या चोरट्याने शाम याच्या पोटावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने वार चुकवला व त्याच्या पायला दुखापत झाली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे स्टेशन परिसरातील नागरिकांची सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.