रत्नागिरी (आरकेजी): किरकोळ भांडणाचा संताप अनावर झाल्याने पतीने रागात रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. दरम्यान, रक्तस्राव होऊन जागीच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यात घडली आहे. सरिता गंगाराम धाडवे असे या महिलेचे नाव आहे.
लांजा तालुक्यातील निवसर सडा येथे मंगळवारी पती- पत्नीमध्ये सायंकाळच्या सुमारास वाद झाला. यावेळी रागाच्या भरात पतीने पत्नी सरिता हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. हा वार वर्मी लागल्याने सरिता ही जागीच कोसळली. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. सरिता हिच्या पतीचे गेल्या काही दिवसापासून मानसिक संतुलन बिघडले होते. यातूनच मंगळवारी झालेल्या किरकोळ भांडणातून सरिता हिचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.