
२००९ तिकीट तपासणी कर्मचार्यांनी १८४० श्रमिक विशेष गाड्यांत स्थलांतरितांना सेवा दिली.
मुंबई, 31 मे : मध्य रेल्वेने २९ मे २०२० पर्यंत ७ लाखाहून अधिक अडकलेल्या लोकांची त्यांच्या घरी पोहोचविसाठी ५७४ श्रमिक विशेष ट्रेनद्वारे देशभरात वाहतूक केली आहे. या ७ लाख श्रमिकांना नि:शुल्क जेवण आणि पाण्यासह आरामदायक प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या डब्ब्यात सामाजिक अंतराची शिस्त राखून ट्रेनमध्ये आरामात चढणे तिकीट तपासणी कर्मचार्यांनी सुनिश्चित केले. त्यांना कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी मुखपट्टी आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला. देशसेवेसाठी आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव ठेवून आघाडीवरील हे योद्धे नि:स्वार्थपणे अधिक कर्तव्य बजावत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअरवर हलविण्यासह, गर्भवती महिलांना सुरक्षित रूग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करण्यासह श्रमिकांना सर्वांगीण मदत ते करीत आहेत. मध्य रेल्वे मार्गे जाणार्या श्रमिक विशेष गाडीतील डब्यांमध्ये अन्न आणि पाणी वितरण सुद्धा ते करीत आहेत.
मध्य रेल्वेतून सुटणा-या ५७४ श्रमिक विशेष गाड्यांसह १८४० श्रमिक विशेष गाड्यांमध्ये सेवेसाठी मध्य रेल्वेने २००९ तिकिट तपासणी कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. यानुसार ते अशा कठीण परिस्थितीतही प्रवाशांना जेवण व पाणी पुरविण्यास मदत करीत आहेत. १४ महिला तिकीट तपासणी कर्मचारीसुद्धा (नागपूर विभागातील ४ आणि पुणे विभागातील १०) या प्रचंड उपक्रमामध्ये सहभागी आहेत. तिकीट तपासणी कर्मचार्यांनी संसर्ग होण्याच्या जोखीमीकडे दुर्लक्ष करून सेवा देण्यासाठी तत्पर, स्थलांतरितांची काळजीने, करुणापूर्वक आणि सौजन्याने हाताळणे, अनेकदा मदत करणे, लहान मुलांना डब्ब्यांपर्यंत घेऊन जाणे, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक बोर्डिंगसाठी व्हील चेअरवर नेणे आणि गर्भावस्थेतील महिलांना जवळच्या रूग्णालयात पाठविण्यासाठी वाहतुकीसह त्वरित मदत केल्याचे काही घटनांवरून दिसले आहे.
उदाहरणार्थ दिनांक २६.५.२०२० रोजी गाडी क्र. 09253 सुरत ते बेहरामपूर श्रमिक विशेष ट्रेन नागपूर स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. ३ येथे आली असता श्री. विष्णू साहू नावाच्या प्रवाशाने ड्यूटीवर असलेल्या तिकीट तपासणी कर्मचार्यांना सांगितले की, त्यांच्या पत्नीला तीव्र प्रसूती वेदना होत आहेत आणि त्यांना तातडीने वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता आहे. कर्तव्यावरील तिकीट तपासणी कर्मचारी श्री. सुनील कुमार, मुख्य तिकिट निरीक्षक, नागपूर आणि त्यांच्या पथकासह उप-स्थानक अधीक्षक (वाणिज्यिक) यांच्या मदतीने ताबडतोब स्ट्रेचरची व्यवस्था केली आणि गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलविले. तिकीट तपासणी कर्मचार्यांनी केलेल्या या उत्स्फूर्त सहकार्यामुळे आणि मदतीमुळे महिलेला रुग्णालयात निरोगी बाळ होण्यास मदत झाली. श्री.विष्णू साहू भारतीय रेल्वेच्या आघाडीवरील कर्मचार्यांनी केलेल्या त्वरित मदतीबद्दल कृतज्ञ आणि कृतज्ञतांनी भरून पावले होते.
त्याचप्रमाणे दुस-या एका घटनेत, 01944 पुणे – लखनऊ श्रमिक विशेष ट्रेनमध्ये पुणे स्टेशनवरील तिकीट तपासणी कर्मचा-यांनी ट्रेनमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना मार्गदर्शन करताना प्रवेशद्वाराजवळ उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला तिच्या मुलासोबत रांगेत वॉकरबरोबर चालताना अडचण होत असल्याचे पाहिले. ताबडतोब, टीसी कर्मचार्यांनी सोबतचे सामान तिच्या मुलाच्या स्वाधीन केले, ज्येष्ठ नागरिकाला जवळपास असलेल्या रिव्हॉल्व्हिंग व्हील चेअरमधून आरामात नेले आणि तिला ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आणि तिला तिच्या बर्थवर आरामात बसवण्याची हमी दिली. पुणे स्टेशनवरील आणखी एका टीसीने, दोन मुलांसह श्रमिक विशेष ट्रेनमध्ये चढून जाण्यासाठी धडपडणार्या महिलेच्या एका लहान मुलाला ट्रेनपर्यंत सोबत घेऊन गेले. मध्य रेल्वे तिकीट तपासणी कर्मचार्यांनी केलेल्या उत्स्फूर्त मदतीच्या उदाहरणांनी प्रवासी जाताना अश्रुपुर्ण व भावनेने भारून गेली आहेत.
या लॉकडाऊन दरम्यान आणि श्रमिक विशेषची धावपळ सुरू असताना, तिकीट तपासणी कर्मचारी हे तत्परतेने मदत करणारे हात असल्याचे सिद्ध झाले, तर श्रमिकांच्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीत स्थलांतरितांच्या पाठीशी भारतीय रेल्वे उभी राहिली आणि आशेचा किरण मिळवून देण्याच्या त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात ठाम राहीली हे सिद्ध झाले आहे.