स्वच्छता पाक्षिकात, संपूर्ण मध्य रेल्वेवरील स्थानकांची साफसफाईची कामे चालू ठेवण्यात आली आहेत. प्रमुख स्थानके स्वच्छ स्टेशन अभियानासाठी सज्ज झाली आहेत, ज्यात श्रमदान उपक्रमांसह स्थानकांची सखोल साफसफाई आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागणे समाविष्ट आहे.
मुंबई विभाग
मुसळधार पाऊस असूनही, स्वच्छ स्टेशन उपक्रम राबवले गेले. कल्याण स्थानकातील प्रवासी प्रतिक्षालय, प्लॅटफॉर्म आणि एफओबीच्या संपूर्ण स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी मास्क आणि सुरक्षा उपकरणाचा योग्य वापर केला आहे याची खात्री करण्यात आली. संपूर्ण प्लॅटफॉर्म परिसर आणि बुकिंग कार्यालयाचे प्रवेशद्वार स्वच्छ झाल्यानंतर मुलुंड स्थानकाचे नवीन आणि छान रूप दिसले. मुलुंड स्थानकातील बाग परिसरात लहान वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. शीव, कळवा, कर्जत, कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असेच उपक्रम राबविण्यात आले.
पुणे विभाग
मिरज, किर्लोस्करवाडी आणि सातारा स्थानकांतील, स्थानकांच्या बाहेरील परिसराची स्वच्छता आणि त्यानंतर बुकिंग कार्यालयांची स्वच्छता सफाई कर्मचा-यांद्वारे करण्यात आली. नंतर प्रवासी प्रतीक्षा कक्ष आणि स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई झाली. पुणे स्टेशनवर सुका आणि ओला कच-याचे व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी सुबकपणे लेबल लावण्यात आले. फूट ओव्हर ब्रिजवर थुंकीचे डाग आणि प्लॅटफॉर्मवरील बसण्याची जागा पूर्णपणे स्वच्छ केली गेली.
नागपूर विभाग
नागपूर विभागाने स्टेशन कर्मचारी आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या सहभागाने स्वच्छता उपक्रम आयोजित केले. सफाई कर्मचाऱ्यांनी अजनी स्टेशनचा संपूर्ण प्लॅटफॉर्म परिसर स्वच्छ केला. नागपूर विभागातील सर्व स्थानकांवर स्थानक प्रमुखांनी सुका आणि ओला कचरा वेगळा करणे सुनिश्चित केले आहे आणि दोन डस्टबिन व्यवस्थितपणे लेबल लावून ठेवण्यात आले आहेत.
सोलापूर विभाग
सोलापूर विभागात सर्व प्रमुख स्थानकांवर सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरगाव स्टेशनचे सफाई कर्मचारी सर्वच प्लॅटफॉर्मच्या संपूर्ण प्लॅटफॉर्म स्वच्छतेमध्ये गुंतले आहेत.
भुसावळ विभाग
झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, भुसावळ यांनी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आसपासच्या परिसरातील जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापक अधिकारी, प्रशिक्षक आणि सुमारे ८० प्रशिक्षणार्थींनी स्वच्छता रॅली आयोजित केली. देवळाली येथे कर्मचाऱ्यांनी तपोवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांना पर्यावरणावरील प्लास्टिकच्या धोक्यांविषयी प्रबोधन करण्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप केले. भुसावळ येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या रस्त्यावर कचरा साफसफाईचे कामही हाती घेण्यात आले.















