Mumbai : मध्य रेल्वेत स्वच्छता पाक्षिकाचा भाग म्हणून “स्वच्छ रेलगाडी” म्हणजेच स्वच्छ गाड्या पाळण्यात आला. मध्य रेल्वेत दि. १६.९.२०२१ ते ३०.९.०२१ पर्यंत स्वच्छता पाक्षिक पाळले जात आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करून स्टेशन आणि शेडमधील गाड्यांची सखोल स्वच्छता करण्यावर भर दिला. स्वच्छतागृहांतील स्वच्छतेबरोबरच गाड्यांमध्ये डस्टबिनची उपलब्धता आणि त्यातील कचऱ्याची विल्हेवाट देखील सुनिश्चित करण्यात आली.
मुंबई विभाग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे गाड्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रेनमधील शौचालयांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची तपासणी केली. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील विशेष गाड्यांची स्वच्छताही करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना खिडक्यांची व्यवस्थित साफसफाई आणि काचेच्या पाट्या पुसण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण ट्रेनचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
पुणे विभाग
पुणे स्टेशनवर ट्रेन क्रमांक 01407 पुणे- लखनऊ विशेष ट्रेनचे फ्लोर क्लिनिंग, पॅनेल आणि शौचालये साफसफाईसाठी उच्च दाबाच्या पाण्याच्या बीमसह सखोल साफसफाई करण्यात आली. फ्लोरींगच्या आणि डब्यांच्या बर्थसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक क्लिनर सह यांत्रिक सफाई करण्यात आली.
नागपूर विभाग
नागपूर विभागातील स्थानकांतील स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि कचरा विल्हेवाटीवर विशेष लक्ष देत गाड्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली.
सोलापूर विभाग
कोपरगाव स्टेशनवर कर्नाटक एक्सप्रेसची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रभावीपणे हाती घेण्यात आले.
भुसावळ विभाग
देवळाली स्थानकात 07618 पनवेल – नांदेड विशेषची साफसफाई कर्मचाऱ्यांनी करण्यात आली आणि ख॓डवा स्टेशनवर शौचालय व वॉश बेसिनवर लक्ष केंद्रित करून इतर गाड्या स्वच्छ करण्यात आल्या. प्रवाशांना कागदी पिशव्या वाटण्यात आल्या आणि डस्ट बिनच्या वापरासाठी समुपदेशन करण्यात आले.














