नवी दिल्ली : : देशातील सर्वोच्च नेते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी लॉकडाऊन आणि कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर ‘नवपदी’ सांगितल्या आहेत आणि केंद्र सरकारने त्याची अमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रधानमंत्रीजी सप्तपदी नाही तर नवपदीची गरज आहे, असे सिताराम येचुरी यांनी ठणकावून सांगितले आहे. पंतप्रधानांच्या १४ एप्रिलच्या भाषणात सुचवली गेलेली सप्तपदी काहीच कामाची नाही. त्याऐवजी सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी सुचवलेली नवपदीची अमलबजावणी करावी, अशी मागणी माकपने केली आहे.
सीताराम येचुरी यांनी सांगितलेली नवपदी :
- आवश्यकतेनुसार वैयक्तिक सुरक्षा साधने पीपीई मिळवा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्या.
- कोरोना तपासण्यांची गती वाढवा.
- सर्व बिगर-आयकर दाता कुटुंबांच्या खात्यामध्ये ताबडतोब 7,500 रु. रोख हस्तांतरण करा.
- सर्व गरजूंना मोफत अन्न वितरित करा.
- आर्थिक दिलासा पॅकेजमध्ये सध्याच्या 0.8 टक्क्यांवरून, जीडीपीच्या कमीत कमी 5 टक्के इतकी वाढ करा.
- उदारपणे निधी देऊन राज्य सरकारांची मदत करा.
- उत्पादन खर्चाच्या दुप्पट +50 टक्क्यांच्या हिशेबाने घोषित समर्थन मूल्यावर शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करा आणि काम असो वा नसो, सर्व नोंदणीकृत मनरेगा मजुरांना मजुरी द्या.
- कामगार/कर्मचाऱ्यांना रोजगार हिरावून घेतला जाणे आणि वेतनकपात यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मालकांना आर्थिक सहाय्य द्या.
- स्थलांतरित कामगारांची आपापल्या घरी परत जाण्याची व्यवस्था करा.