मुंबई : वरळीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महागाईविरोधात तीव्र निदर्शने केली. पक्षाने महागाई व बेरोजगारी विरोधात राज्यभर निदर्शने करण्याची हाक दिली आहे. या मोहीमेचा प्रचार करण्यासाठी काल दि.२८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ६ वा.च्या दरम्यान माता रमाबाई आंबेडकर नगर,वरळी,बुद्ध विहार येथे महागाई विरोधातील पत्रके वाटप करण्यात आली.ॲड.इरमायटी इराणी,व काॕ.सोन्या गिल, प्रवीण मांजलकर आदी सहभागी झाले होते. सर्व पक्ष सभासद जनसंघटनेच्या कार्यकर्त्यांसह वेळेवर उपस्थित राहिले आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन केले, असे प्रमिला भास्कर मांजलकर,शाखा सेक्रेटरी,जिजामाता नगर यांनी सांगितले. ३१ मे च्या वांद्रे कलेक्टर आॕफीसवरील निदर्शनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन प्रवीण मांजलकर यांनी केले आहे.