Mumbai : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मानखुर्द शाखा – मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र नगर येथील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नावर दिनांक १५/०७/२२ रोजी एम पुर्व विभाग कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नागरिकांनी चांगला सहभाग नोंदवला. हवामान विभागाने मुंबई-कोकण येथे अतिवृष्टी चा इशारा दिला होता, व शाळा कॉलेजला सुट्टी दिली होती, या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व पक्षाच्या नेत्या काॅ. आरमायटी इराणी व काॅ. संगीता कांबळे यांनी केले.
महत्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे होत्या.
१) सबवेत पाणी तुंबून रहदारी बंद होऊ नये म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढा .
२) प्रस्तावित नाला रूंदीकरणाचे रखडलेले काम तबोडतोब मार्गी लावा.
३) MPS शाळेत शिक्षकांची नियुक्ती करून, शैक्षणिक प्रवेश इच्छुक मुलांना तुकड्या वाढवून प्रवेश द्यावा.
४) एस.पी.पी. एल. बिल्डिंग नं १ ते ३, १५ते १७,व ३० ते ३२ च्या आवारात पाऊस जोरात झाला की नियमित पाणी तुंबते, हे पाणी बिल्डिंग च्या मीटर बॉक्स वर लिफ्टमध्ये सुद्धा घुसते आणि त्यामुळे बिल्डिंगला सुद्धा हानी होत आहे. यावर उपाय योजना करावी.
५) खंडोबा मंदिर येथील १० ते १५ चाळीनां शौचालय सुविधा नाही, याकरिता ताबडतोब लक्ष घालून सुविधा मिळाव्यात.
६). बंजारवाडा ते भीमनगर पर्यंत नाला सफाई झालेली नाही ती करुन द्यावी.
७) रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, बुजवावेत व उघडृया नाल्यवर झाकणे टाकून बंदिस्त करण्यात यावेत
इत्यादी मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले.
सहा. आयुक्त उबाळे साहेब, मेंटेनन्स चे खान साहेब व शिक्षण विभागाचे एज्युकेशन ऑफिसर शेख साहेब यांच्याशी शिष्टमंडळाने निवेदन दिले व चर्चा केली. सर्व सकारात्मक चर्चा झाली. शिष्टमंडळात कॉ. संगीता कांबळे, काॅ. लतिका, काॅ. अरुणा गावडे, काॅ. लीला भिसे इत्यादी सहभागी होते.
शिष्टमंडळाशी चर्चा करताना वॉर्ड ऑफिसर, उबाळे साहेब यांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले.
*एक महिन्याच्या आतमध्ये नाला रुंदीकरणाचे काम मार्गी लावत आहोत, अडीचशे मिटर चा एक टप्पा, असे टप्पा टप्याने पुनर्वसन करुन नाल्याचे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले.
* २००० चे पुरावे असणारे पात्र करण्यात येणार व ताबडतोब घरे महाराष्ट्र नगर मध्येच देण्यात येतील व अपात्र असणाऱ्यांना 2013 च्या जीआर मध्ये बसवले जाईल असे सांगण्यात आले.
*कचऱ्याचं काम ताबडतोब साफ केले जाईल गटरावर झाकणी टाकून रस्त्याचे खड्डे सुद्धा बुजवण्यात येतील असे सांगितले हे काम सात दिवसांत पूर्ण होईल.
*सबवे मध्ये पाणी तुंबून रहदारी बंद होऊ नये यासाठी पंप लावलेला आहे व दुसरीकडे फुलेनगरच्या साईटला तिकडे पाणी अडवलेले आहे आणि महाराष्ट्र नगर मध्ये पाणी तुंबुन राहु नये यासाठी युध्दपातळीवर काम सुरू ही आहे.
* एस.पी .पी .एल. बिल्डिंग १ ते ३ ,१५ ते १७, व ३० ते ३२ यांच्या आवारात पावसाळ्यात पाणी भरु नये यासाठी सुद्धा तसे उपाय योजना सुरू आहे, रेल्वे च्या हददीत असणार्या झोपड्या मुळे असलेल्या पुढे पाणी जात नाही. त्यावर उपाय सुरू असुन पाणी भरणार नाही याची दखल घेण्यात येईल.
-एमपीएस शाळेमध्ये शिक्षक नाही, त्याची भरती होणार आहे. तोपर्यंत खाजगी शिक्षक देऊन अभ्यासक्रम सुरू करू.
*नवीन तुकड्या वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर इच्छुक मुलांना प्रवेश देण्यात येईल.
अशाप्रकारे चर्चा झाली. तसेच खंडोबा मंदिर येथील शौचालय बांधकाम जानेवारी पासून सुरू होईल तोपर्यंत तात्पुरते शौचालय उभारले असून तीथे लाईट पाणी रस्ता इत्यादी काम सुरू आहे. ते दोन चार दिवसात पूर्ण होईल ईत्यादि, कॉ. संगीता कांबळेनी शिष्टमंडळातुन परतल्यानंतर शिष्टमंडळात झालेल्या चर्चेची रहिवाशांना माहिती दिली. देवनार पोलिस स्टेशनचा आभार मानुन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.