मालेगाव : मालेगाव शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारून बी. ए. यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या 90 वर्षी निधन झाले. त्यांचे वडील मालेगाव शहराचे स्वातंत्र्य कालीन पहिले आमदार साबीर सत्तार होते. कॉम्रेड हारून मालेगावातील पाहिले उच्चशिक्षित बी. ए. त्या वेळी झाल्याने त्यांचे नाव हारून बी. ए. नाव त्यांना मिळाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मालेगाव येथे उभारण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. मालेगाव महापालिकेत त्यांनी पक्षाचे 7 नगरसेवक निवडून आणले होते. मनपा स्थायी समितीचे सभापती म्हणून ही काम पाहिले. मनपा मालेगावचे 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. पावरलूम उद्योगाला शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वीज बिलात सवलत मिळते, त्या प्रमाणे मिळावी यासाठी 180 दिवस आंदोलन केले. 19 95 ला तत्कालीन ऊर्जा मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून पावरलूम उद्योगाला राज्यभर सवलत मिळवून दिली. पावरलूम ऍक्शन कमिटी मालेगाव चे 20 वर्ष अध्यक्ष होते. मालेगावातील शैक्षणिक संस्था, तसेच पाणी पुरवठासाठी टाक्या बांधणीत योगदान दिले.
पक्षाच्या वतीने त्यांना सोव्हिएत रशियाला 1 महिना दौरा करता आला. त्यामुळे रशिया-भारत मैत्री सबंधातून ईस्कस लायब्ररी ची स्थापना मालेगाव येथे त्यांनी केली. आज अ वर्गाचे वाचनालय आहे. त्या ठिकाणी प्रबोधनचे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्यांनी बेबाक नावाचे वृत्तपत्र चालवले. त्याचे ते संपादक होते. प्रगतिशील लेखक संघ मालेगाव वतीने विविध साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार राहिला. धर्मनिरपेक्ष , समाजवादी चळवळ, कम्युनिस्ट ,परिवर्तन वादी चळवळ त एकत्रित काम करण्यात त्यांचा पुढाकार होता. भाकप नेते मनमाड कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड ए बी बर्धन, कॉम्रेड शमीम फैजी , निहाल अहमद हरिभाऊ महाले यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यांचे मालेगाव शहरासाठी पावरलूमउदयोग व कामगार तसेच सांस्कृतिक कार्य नेहमी स्मरणात राहील. त्यांचा मालेगाव नागरीकच्यावतीने नागरिक सत्कार करण्यात आला होता. तसेच भाकप व आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते ही सत्कार करण्यात आला होता. संपूर्ण आयुष्य भारतीय कम्युनिस्ट पक्षकार्यसाठी देणारे समतावादी, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्यासाठी कार्यरत कॉम्रेडला भाकप ,आयटक, किसान सभा महाराष्ट्र वतीने आदरांजली वाहण्यात आली.