कोल्हापूर : ज्युडीशीयल एम्प्लॉइज स्पोर्ट्स क्लब महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी क्रीडा आणि कल्याण संघटना यांच्या वतीने कोल्हापुरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आल आहे. 29 डिसेंबर ते एक जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी 34 जिल्ह्यांतील न्यायालयिन कर्मचाऱ्यांचे संघ कोल्हापुरात येणार आहेत. कोर्ट प्रीमियर लीगच्या चषक आणि टी-शर्टचे अनावरण मुख्य जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते झालं, अशी माहीती महाराष्ट्र राज्य न्यायालयिन कर्मचारी क्रीडा व कल्याण संघटनेचे अध्यक्ष डी. ए. लिंबोळे यांनी दिली.
दरवर्षी कोर्ट प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा कोल्हापुरातील कसबा बावडा , दुधाळी, शास्त्रीनगर, मेरिवेदर आणि शाहूपूरी जिमखाना या मैदानावर मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे संघ कोल्हापुरात येणार आहेत. या स्पर्धेसाठी वीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रत्येक संघाचे टी शर्ट आणि चषक यांचे अनावरण न्यायाधीश कविता अग्रवाल, प्रमुख कौटुंबिक न्यायाधीश पी. के. अग्निहोत्री, जिल्हा न्यायाधीश पीएफ सय्यद, एस. आर. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश वी. पी. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. ए. बाफना, विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रमोद पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, क्रिमिनल बारचे चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एस. बी. पाटील, श्रीकांत सकपाळ, सुशांत साळुंखे उपस्थित होते, असे महाराष्ट्र राज्य न्यायालयिन कर्मचारी क्रीडा व कल्याण संघटनेचे अध्यक्ष डी. ए. लिंबोळे यांनी सांगितलं.