मुंबई : गिरणी कामगारांसाठी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे रत्नागिरी येथे शनिवार, दि. २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृह येथे समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी ५०९० सदनिकांची सोडत लवकरच काढण्यात येणार असून त्यात रत्नागिरीवासीय गिरणी कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गिरणी कामगार सदनिका सोडतीविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. सोडतीसाठी अर्ज कसे दाखल करावेत, कोण लाभार्थी होऊ शकतात, याची सविस्तर माहिती या शिबिरात म्हाडातर्फे दिली जाणार आहे. तरी सर्व लाभार्थी गिरणी कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे करण्यात आले आहे.