कल्याण – कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सुनिता खैरनार यांनी कल्याणमधील नवज्योती अनाथ आश्रमात बालकांसह दिपावली साजरी केली. यावेळी एका बालकाचा वाढदिवस साजरा करून मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला.
सुनिता खैरनार या व्यवसायाने शिक्षीका असून त्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे तसेच राष्ट्रीय पातळीवरील सर्व पदाधिकारी सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. कल्याणमधील आश्रमात पार पडलेल्या कार्यक्रमाची प्रसार माध्यमांनीही दखल घेतली. सुनिता खैरनार या गेले अनेक वर्ष संविधान सैनिक संघाच्या माध्यमातूनही कार्यरत असून त्यांचा आश्रमालयातील कार्यक्रम मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून पहिला असल्याने या कार्यक्रमाला आश्रमालयातील कर्मचारी वृंदाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात फराळ, नवीन कपडे मुलांना दिवाळी भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कातखडे, सुनिता खैरनार, अरुणा गोफणे, सुनंदा जाधव , करुणा कातखडे, वंदना वाणी, पोवार, वानखेडे, खरात, वाघमारे यांनी परिश्रम घेतले.