मुंबई, दि.२० जून : राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
प्रविण दरेकर यांनी माजी नगरसेवक व मुंबई उपाध्यक्ष विनोद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मालाड येथे पारखे हॉलमध्ये १८ ते ४४ वयोगटाकरिता उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. तसेच बोरीवली येथे आमदार मनिषाताई चौधरी यांच्या सौज्याने उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटनही केले. बोरिवली परिसरातील सुमीत घाग मित्र मंडळ आयोजित विभागातील गरजुंना मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व जनतेसोबत संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.
मालाड व बोरिवली येथील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण केंद्राचा आढावा दरेकर यांनी आज घेतला. दरेकर म्हणाले, कोरोना आटोक्यात येत असून पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कोरोना आटोक्यात आण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे,असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
दरेकर म्हणाले की, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाला जो धोका निर्माण झालेला आहे यातून सावरण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि आज बोलण्यापेक्षा कृती करण्याची गरज आहे. भाजपच्यावतीने वृक्षारोपणासाठी अनेक मोहीमा घेतल्या जातात. आज दहिसर येथील नेन्सी कॉटेज नवरंग मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. केवळ झाड लावायची नाही तर नीटपणे त्याच संगोपन केले पाहिजे. प्रत्येकांने झाड दत्तक घेण्याची आवश्यकता आहे, त्यावेळी दरेकर यांनी सांगितले.
मालाड येथाल लसीकरण केंद्र उद्घाटनाप्रसंगी रघुनाथ कुलकर्णी, मनाली विनोद शेलार, सुरेंद्र यादव, विनोद मिश्रा, पुनित अग्रवाल, प्रमोद शेलार, परेश गोहील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच बोरीवली येथे उभारण्यात अलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, जिल्हाध्यक्ष गणेश खाणकर, नगरसेवक जगदिश ओझा, जितेंन्द्र पटेल, हरिष छेडा, विद्यार्थी सिंग त्याचबरोबररघुनाथ कुळकर्णी, प्रकाश दरेकर, बाबा सिंग, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव इथ्यादी मान्यवर उपस्थित होते.