
मुंबई : मुंबई आणि एमएमआर रिझन भागातील गृहनिर्माण सोसायटयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील नियम, पाळावेत, असे आवाहन राज्याच्या सहकार विभागाने केले आहे.
- इमारतीच्यागृहनिर्माण संस्थेने संस्थेच्या गेटजवळ सेनीटायझर्स ठेऊन प्रवेश करणार्या व्यक्तिला सक्तीने हात स्वच्छ धुण्यास सांगितले पाहिजे.
- इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यालाआवश्यक किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टीची मागणी गोळा करावी आणि त्यानुसार जवळच्या किराणा व भाजीपाला दुकानातून वगैरे जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर द्यावे.
- आलेलेसामान गेटवरतीच मागवून घ्यावे. प्रत्येक सदस्यांच्या घरी सिक्युरिटीमार्फत हे सामान पोहोचवावे. प्रत्येक घरातील १ सदस्याला बोलून गेटवर त्याचे वाटप करावे, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच संस्थेचे सदस्य कोणत्याही तातडीच्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता संस्थेच्या पदाधिकार्यांनी घेतली पाहिजे.
- सोसायटीचे क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य आणि लहान मुले एकत्र येणार नाहीत. याबाबत योग्य तीदक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत
आपली सहकारी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट असताना गृह निर्माण संस्थांचे अध्यक्ष ,सेक्रेटरी, संचालक मंडळ आणि सदस्यांनी सरकरचे सर्व नियम सक्तीने पाळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले यांनी केले आहे. या सूचना सोसायट्यांना दिल्या असल्याचे जेबले यांनी सांगितले.
















