
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला. खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. 6 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आजच त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती. रत्नागिरीत आतापर्यंत 4 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला. 2 रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.














