मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्याआधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका वकारउन्निसा अन्सारी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये प्रवेश केला. पक्षाने तिकीट नाकारून नवख्याला उमेदवारी दिल्याने नाराज अन्सारी यांनी पक्ष सोडला आणि एमआयएममध्ये प्रवेश केला.
तब्बल चारवेळा नगरसेविका म्हणून निवडली गेली आहे. तरिही मला डावलून पक्ष नवीन उमेदवाराला उमेदवारी देणार आहे. त्यामुळे कॉंंग्रेस हा पक्ष आपण सोडत आहोत, असे अन्सारी म्हणाल्या. बी वॉर्डातील प्रभाग क्रमांक २२२ चे प्रतिनिधित्व अन्सारी या करत आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी, अशी विनंती केली होती. परंतु, पक्षाने त्यांना नाकारले. एमआयएम प्रथमच मुंबई महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याक मते विभागली जाणार असल्याचे बोलले जात आहे.