महागाई, बेरोजगारीविरोधात चिपळुणात निदर्शने; निषेधाच्या घोषणा
चिपळूण : महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढवलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसतर्फे चिपळुणात तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा धिक्कार करून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. हुकूमशाहीने कारभार करणाऱ्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने आज सकाळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये केलेली वाढ यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने घाईघाईत सुरू केलेल्या भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलन करण्याचे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. नानाभाऊ पटोले यांनी दिले होते. त्यानुसार काँग्रेसतर्फे चिपळुणात आंदोलन करण्यात आले. निषेधाचे फलक आणि काँग्रेसचे झेंडे घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयासमोर जमले होते. मोदी सरकारच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, कबीर काद्री, करामत मिठागरी, माजी नगरसेविका सफा गोठे, वासुदेव सुतार, प्रकाश साळवी, जिल्हा प्रवक्ता इब्राहीम दलवाई, काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हा सरचिटणीस रफीक मोडक, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, गुलजार कुरवले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, मजिद मुल्लाजी, यशवंत फके, मनोज दळी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, रुपेश आवले, राजेंद्र भुरण, सयाजी पवार, नियाज सनगे, महादेव चव्हाण, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, नईम खाटीक, समीर खेरटकर, जिल्हा चिटणीस सिकंदर नाईकवाडी, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, नजीर शेख, नंदकुमार कामत, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष सरफराज गोठे, विनायकराव जाधव, सर्फराज घारे, युवक काँग्रसचे प्रदेश प्रवक्ते यश पिसे, नंदू खंडजोडे, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, स्नेहा ओतारी, शहर उपाध्यक्ष, रुक्मिणी खंडजोडे, उषा मते, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, शहर उपाध्यक्ष मीरा नारकर, संगीता लोटे, विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गौरी हरधारे, निकीता मांडवकर, सारिका कदम आदी उपस्थित होते. निदर्शने झाल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारपर्यंत जनतेच्या भावना पोहचवण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
…………….
80 वर्षीय आबा डाकवेंची उपस्थिती लक्षवेधी!
यावेळी निदर्शनात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक उर्फ आबा डाकवे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. वय वर्षे 80, नीट उभेही राहता येत नाही, तरीही निदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या आबांनी जोरदार घोषणाबाजी करीत भाजप सरकारचा निषेध केला. भाजप सरकारने देश विकायला काढायला आहे, महागाईमुळे जनता होरपळून जात आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संतापही व्यक्त केला.