![](https://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2021/06/Mh_rtn_01_petrol-vatap_ph01_mh10046-300x138.jpg)
वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस देशात संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने चिपळूण काँग्रेसने देखील तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेऊन हा वाढदिवस खऱ्या अर्थाने संकल्प दिन म्हणून साजरा केला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस देखील विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानंतर शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये खेर्डी विभागातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. याचबरोबर दैनिक सागरचे कर्मचारी रुपेश जाधव यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणे मुश्कील झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन मिरजोळी येथील एका पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिक व दुचाकीस्वरांना पाच रुपये कमी दरात पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला. २५ रिक्षा व्यावसायिकांना दोन लिटर पेट्रोल मोफत तर दुचाकीस्वारांना ५ रुपये सवलतीत पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम झाला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, गुलजार कुरवले, मुन्ना दळी, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, शहराध्यक्ष गौरी हरदारे यांनी हे उपक्रम राबवले.