
विक्रोळी: महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे विक्रोळी कन्नमवार नगर मधील रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार केली असतानाही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या विरोधात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहुल वाघधरे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार ता ( 26) रोजी जनता मार्केट येथे “खड्डे बुजाव” आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यांवर खडी टाकून बुजवण्याचे काम सुरू केले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे हे महानगपालिकेचे अपयश आहे. दरवर्षी त्याच जागेवरती खड्डे कसे पडतात. पालिका प्रशासन करतो तरी काय? आणि खड्डे पडल्यानंतर फक्त वरच्या वर खडी टाकून जातात. काही तासांनंतर रूपांतर पुन्हा खड्ड्यात होतं. या खड्ड्यामुळे कोणाचा अपघात झाला? कोणाचा जीव गेला? तर कोण जबाबदार? असा सवाल राहुल वाघधरे यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनामुळे एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काँग्रेसने या खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढत विकास बीएमसी असे लिहिले आहे.
रस्त्यावरील खड्डयांना सफेद रंगाने अधोरेखित करत महानगर पालिकेला जाग यावी आणि लवकरात लवकर खड्डे बुजवले जावे म्हणून #BMC विकास # लाडका कंत्राटदार असे नमूद कण्यात आले.
यावेळी मुंबई काँग्रेस विक्रोळी ब्लॉक अध्यक्ष राहुल वाघधरे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री आशिष, महिला काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष प्रज्ञा कदम, जिल्हा महिला काँग्रेस सचिव विजया वाघमारे, महिला काँग्रेस वॉर्ड उपाध्यक्ष अनिता विश्वकर्मा, युवक काँग्रेस सहकारी सचिन लोहेरा हे उपस्थित होते.















