मालाड, (निसार अली) : मालवणी येथील रमझान अली शाळेत मुंबई काँग्रेसने प्रोजेक्ट शक्तीच्या माध्यमातून नुकतेच शक्ती प्रदर्शन केले. नवीन कार्यकर्त्यांची नोंदणी तसेच जनता व मतदार यांच्याशी थेट संपर्क सुरू करण्यात आला. त्यांची नोंदणी व माहिती संकलन देखील यावेळी झाले. महिला कार्यकर्त्यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी मार्गदर्शन केलं. या वेळी नगरसेविका कमर्जाह सिद्दीकी, सलमा अलमेलकर, नगरसेवक वीरेंद्र चौधरी, मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष अजंता यादव, डॉ. नेकसन नाटके व शेकडो महिला, पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.