तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय रेडीज यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदानचिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश संघटकपदी कामथे येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अजित अजित वसंत कासार यांची निवड करण्यात आली. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय रेडीज यांच्या हस्ते श्री. कासार यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, मा. राहुलजी गांधी, मा. प्रियंकाजी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री (छत्तीसगड) मा. ताम्रध्वजजी साहू यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने श्री. अजित कासार यांची ही निवड करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिले आहे. मा. प्रशांत यादव यांच्या हस्ते मंगळवारी हे पत्र श्री. कासार यांना प्रदान करण्यात आले. यावेळी चिपळूणचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक करामत मिठागरी, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, ज्येष्ठ नेते व प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई, ज्येष्ठ नेते सुरेश राऊत, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष एड. जीवन रेळेकर, भरत लब्धे, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव संजय जाधव, जिल्हाध्यक्ष दीपक निवाते, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, सुरेश पाथरे आदी उपस्थित होते.















