रत्नागिरी, प्रतिनिधी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सोमवारी कराड येथील कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराडच्या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आणि प्रकल्पाविषयी माहिती घेतली . यावेळी श्री . यादव यांचे स्वागत दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई आणि डेअरी व्यवस्थापक श्रीकांत हनबर यांनी केले. चिपळूण येथे यादव यांच्या पुढाकाराने नवीन दूध प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी यादव इतर प्रकल्पांची माहिती घेत आहेत.काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांची कोयना दूध संघाला भेट
रत्नागिरी, प्रतिनिधी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सोमवारी कराड येथील कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. कराडच्या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आणि प्रकल्पाविषयी माहिती घेतली . यावेळी श्री . यादव यांचे स्वागत दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई आणि डेअरी व्यवस्थापक श्रीकांत हनबर यांनी केले. चिपळूण येथे यादव यांच्या पुढाकाराने नवीन दूध प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी यादव इतर प्रकल्पांची माहिती घेत आहेत.















